शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
7
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
8
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
9
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
10
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
11
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
12
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
13
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
14
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
15
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
16
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
17
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
19
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
20
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

डंपरवर दुचाकी आदळल्याने एक युवक ठार तर एक जखमी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 20:04 IST

नादुरुस्त डंपरवर दुचाकी आदळल्याने यात दुचाकीवरील २३ वर्षीय युवक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना दि १ मे रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंप्री आकराऊत जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली .

  जळगाव -  नादुरुस्त डंपरवर दुचाकी आदळल्याने यात दुचाकीवरील २३ वर्षीय युवक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना दि १ मे रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंप्री आकराऊत जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली .

        पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार  , तालुक्यातील पिंप्रीआकराऊत फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  ६ वर डंपर क्र MH 19 Z - 4983 हा नादुरुस्त डंपर महामार्गावर नादुरुस्त स्थितीत उभा होता . डंपर चालकाने रस्त्याच्या परीस्थीतीचा विचार न करता व कोणतेही दिशादर्शक फलक न लावता रस्त्यावर बेशिस्त पणे वाहन लावलेले होते . १ मे रोजी तालुक्यातील तरोडा येथील विठ्ठल लक्ष्मण झाल्टे व अर्जुन नामदेव पिवटे हे दोघे दुचाकी क्र MH 19 CD 2173 ने मुक्ताईनगर कडे येत असतांना उभ्या नादुरुस्त डंपरवर दुचाकी धडकल्याने विठ्ठल लक्ष्मण झाल्टे वय २३ हा युवक जागीच ठार झाला . तर अर्जुन पिवटे हा जखमी झाल्याची घटना पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी प्रभाकर पिवटे रा . तरोडा ता.मुक्ताईनगर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात डंपर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .      विठ्ठल झाल्टे याचे अपघातात मृत्यु झाल्याची वार्ता कळताच तालुक्यातील हरताळा येथील झाल्टे यांचे मरणामुळे प्रशुब्ध होवून तेजस भावराव बाणाईत , विजय अरुण अहीर , राम श्रीकृष्ण जांभूळकर , रविंद्र एकनाथ पाटील व इतर १० ते १२ जणांचा जमाव सर्व रा . हरताळा यांनी मध्यरात्रीच दीड ते दोन वाजेच्या सुमारास घटनास्थळ गाठुन नादुरुस्त डंपरच्या काचा फोडून डंपर पेटवून नुकसान केले . तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर देखील मोर्चा वळवून वाहनांच्या काचा फोडल्या तसेच मयत झाल्टे याचे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता रुग्णालयाच्या खिडक्यांच्या  तोडफोड  करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला . याप्रकरणी हवालदार रवि सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन तेजस बाणाईत ,विजय अहीर , राम जांभूळकर , रविंद्र पाटील व इतर १० ते १२ जणांविरुद्ध दंगलीचा व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सर्व चारही आरोपींना अटक करण्यात आली असुन तपास सहाय्यक फौजदार माणिक निकम करीत आहे .

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव