मारहाणीतील आरोपीस एक वर्षाच्या कैदेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:07 IST2020-02-28T18:59:03+5:302020-02-28T19:07:00+5:30
साक्षीदारास घरात घुसून मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना न्यायाधीश ए.ए.कुलकर्णी यांनी शिक्षा सुनावली.

मारहाणीतील आरोपीस एक वर्षाच्या कैदेची शिक्षा
जामनेर, जि.जळगाव : साक्षीदारास घरात घुसून मारहाण करणाऱ्या हिवरखेड बुद्रूक, ता.जामनेर येथील तीन आरोपींना येथील न्यायालयाचे न्यायाधीश ए.ए.कुलकर्णी यांनी एक वर्ष साधी कैद व तीन हजार ९०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
प्रकाश किसान पाटील यांना सामायिक बांधावरील झाडे तोडू नका या कारणावरून आरोपी तुकाराम चौधरी, किशोर चौधरी व संदीप चौधरी (सर्व रा.हिवरखेड बुद्रूक, ता.जामनेर) यांनी घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली होती. ही घटना २१ फेब्रुवारी २०१७ रोजी घडली होती. तुकाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दंडाच्या रकमेतून तीन हजार प्रकाश पाटील याना नुकसान भरपाई देण्याचे निकालात म्हटले आहे. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अनिल सारस्वत यांनी बाजू मांडली. हवालदार गुणवंत सोनावणे व हरिश्चंद्र पवार यांनी सहकार्य केले.