One Warkari killed, one injured in motorcycle collision | मोटारसायकलच्या धडकेत एक वारकरी ठार, एक जखमी

मोटारसायकलच्या धडकेत एक वारकरी ठार, एक जखमी


रावेर : बक्षीपूर येथे काल्याच्या कीर्तनासाठी पायी जात असलेल्या दोघा वारकऱ्यांंना मोटरसायकलने धक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. हा अपघात गुरुवारी २० रोजी सकाळी ११ च्या दरम्यान झाला.
याबाबत वृत्त असे की, येथील महात्मा फुले चौकातील भजनी मंडळातील दोन्ही वारकरी बक्षीपूर येथील श्रीमद् भागवत कथा सप्ताहातील सांगता समारंभातील काल्याच्या कीर्तनासह महाप्रसादासाठी पायी जात असताना मागून येणाºया मोटारसायकलस्वाराने (एमपी ६८ /एमएफ ६९४२) जबर धडक दिल्याने दोन्ही गंभीर जखमी झाले. यापैकी तुळशीराम सोमा महाजन (वय ८१) यांचेवर रावेर ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला तर दुसरे जखमी वसंत रूपचंद महाजन (वय ७३) यांचेवर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात बादखेडा, ता. शाहपूर येथील अल्पवयीन मोटारसायकल चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही जखमींपैकी तुळशीराम सोमा महाजन (वय ८१) यांच्या मे़ेंदूला गंंभीर दुखापत होवून अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना अंबिका व्यायाम शाळेच्या रूग्णवाहिकेतून रावेर ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मुकाडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र यश आले नाही. तुळशीराम महाजन यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते कैलास व सुनील महाजन यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: One Warkari killed, one injured in motorcycle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.