लालमाती आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा न्यूमोनियाने तर दुसऱ्याचा सिकलसेलने मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:49 AM2020-01-23T00:49:07+5:302020-01-23T00:51:08+5:30

लालमाती शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी असलेल्या दोन्ही जुळ्या भावांना पालकांनी घरी नेले असताना, राकेश जगन बारेला (वय ६) याचा ११ जानेवारी रोजी उलटी फुफ्फुसात गेल्याने न्यूमोनिया होऊन, तर दुसºयाचा दि. १८ रोजी त्याचे वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल पाहता सिकलसेलने अत्यवस्थ होऊन मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

One of two students from Lalmati Ashram school died of pneumonia and another died of sickle? | लालमाती आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा न्यूमोनियाने तर दुसऱ्याचा सिकलसेलने मृत्यू?

लालमाती आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा न्यूमोनियाने तर दुसऱ्याचा सिकलसेलने मृत्यू?

Next
ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांचा प्राथमिक अंदाजसात महिन्यांत ‘सिकलसेल’चे निदान होऊ न शकल्याने शालेय आरोग्य तपासणीवर प्रश्नचिन्ह

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील लालमाती शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी असलेल्या दोन्ही जुळ्या भावांना पालकांनी घरी नेले असताना, राकेश जगन बारेला (वय ६) याचा ११ जानेवारी रोजी उलटी फुफ्फुसात गेल्याने न्यूमोनिया होऊन, तर दुसºयाचा दि. १८ रोजी त्याचे वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल पाहता सिकलसेलने अत्यवस्थ होऊन मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान, सिकलसेल हा अनुवंशिक आजार असल्याने त्याच्या आई वडिलांच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी गेलो असता संबंधित मात्र त्यांनी नकार दिल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.
शासकीय आश्रमशाळेतील दोन्ही जुळ्या भावांचा आठ दिवसांनी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
यावल आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्पाधिकारी डी.बी.चौधरी व जावेद तडवी तथा रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.डी.महाजन, शालेय आरोग्य वैद्यकीय तपासणी पथकातील डॉ.बारेला, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, फौजदार मनोज वाघमारे यांनी मयत विद्यार्थ्यांच्या घरी व शासकीय आश्रमशाळेत भेट देऊन चौकशी केली. तेव्हा शाळेत वेळोवेळी वैद्यकीय आरोग्य पथकाने तपासणी केल्याचे स्पष्ट केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण निष्पन्न नसल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
सात महिन्यांत ‘सिकलसेल’चे निदान होऊ न शकल्याने शालेय आरोग्य तपासणीवर प्रश्नचिन्ह
लालमाती येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची अटल आरोग्य तपासणी व रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या शालेय आरोग्य तपासणी पथकांकडून गत सात महिन्यांपासून नियमीत आरोग्य तपासणी केली जाते, दररोज पहाटे आजारी विद्यार्थ्यांना शाळेतून वैद्यकीय तपासणीला रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले जात असल्याचा दावा शालेय प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र तब्बल सात महिन्यांपासून या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची नियमीत आरोग्य तपासणी होत असताना सिकलसेलने बाधित विद्यार्थ्यांची लक्षणे उघडकीस येऊ न शकल्याबाबत अटल आरोग्य व शालेय आरोग्य तपासणी पथकांच्या आरोग्य तपासणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

राकेश बारेला यास सर्दी खोकल्याचा त्रास असल्याने तो राहत्या घरी झोपलेल्या स्थितीत उलटी होवून फुफ्फुसात शिरल्याने न्युमोनिया होवून तत्काळ मृत्यू झाला असावा. आकेश याचा रक्तातील हिमोग्लोबीन केवळ १.३५ टक्के व पांढºया तथा लाल रक्तपेशी कमालीच्या घटून तथा प्लीहा व यकृतावर सूज आल्याची लक्षणे ही सिकलसेलची असल्याने त्याचा मृत्यू सिकलसेलने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे
-डॉ.एन.डी महाजन, वैद्यकीय अधीक्षक, रावेर ग्रामीण रुग्णालय, रावेर

आमच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील वसतिगृहात २१५ विद्यार्थी रहिवासी आहेत. आकेश व राकेश जगन बारेला या दोन्ही जुळ्या मुलांना आई-वडिलांच्या भेटीसाठी ५ जानेवारी रोजी त्यांचा मोठा भाऊ घरी घेऊन गेला होता. राकेश याचा ११ जानेवारी रोजी अकस्मात मृत्यू झाला, तर आकेश याची प्रकृतीही घरी असतानाच गंभीर झाली होती. मात्र, आमचा विद्यार्थी या नात्याने व शासनाकडून औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्या पालकांसमवेत थेट तातडीच्या औषधोपचारासाठी धडपड केली. मात्र हाती अपयश आल्याचे दु:ख आहे
-मनीष रज्जाक तडवी, प्रभारी मुख्याध्यापक व वसतीगृह अधीक्षक, लालमाती शासकीय आश्रमशाळा, लालमाती

Web Title: One of two students from Lalmati Ashram school died of pneumonia and another died of sickle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.