एक हजार हेक्टर क्षेत्रात पिके बाधित

By Admin | Updated: September 22, 2015 23:52 IST2015-09-22T23:52:22+5:302015-09-22T23:52:22+5:30

शिंदखेडा : गत आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील एक हजार 60 हेक्टर क्षेत्रास फटका बसला आहे.

In one thousand hectares crops inhibited | एक हजार हेक्टर क्षेत्रात पिके बाधित

एक हजार हेक्टर क्षेत्रात पिके बाधित

शिंदखेडा : गत आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती व पिके मोठय़ा प्रमाणावर बाधित झाले आहेत. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाज अहवालानुसार एक हजार 60 हेक्टर क्षेत्रास फटका बसला आहे. दरम्यान महसूल व कृषी विभागांच्या कर्मचा:यांमध्ये समन्वय नसल्याने गेल्या दोन दिवसात पंचनामेच होऊ शकले नसल्याची बाब समोर आली आहे. जेथे होत आहेत तेथे ते अत्यंत संथगतीने होत असल्याची ओरड शेतक:यांकडून केली जात आहे.

प्रांताधिका:यांनी खडसावले

दोन्ही विभागाच्या कर्मचा:यांमध्ये समन्वय नसल्याने या संदर्भात प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी त्यांना खडसावले असून तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

शेतक:यांची निवेदने

नुकसानीचे पंचनामे त्वरित करा या मागणीसाठी चिरणे, हतनूर, परसामल, अलाणे, दरखेडा, वरझडी, जुने कोळदे आदी ठिकाणच्या शेतक:यांनी तहसील प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत.

 

Web Title: In one thousand hectares crops inhibited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.