भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथे विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 18:04 IST2019-07-07T18:02:36+5:302019-07-07T18:04:54+5:30
कन्हाळा खुर्द येथे सासरवाडीत अपघाती पत्नीस पाहण्यासाठी आलेल्या वेडसर इसमाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथे विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कन्हाळा खुर्द येथे सासरवाडीत अपघाती पत्नीस पाहण्यासाठी आलेल्या वेडसर इसमाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. संतोष महादेव चंदनशिवे हे (वय ४०, रा. फैजपूर, ता.यावल) असे त्याचे नाव आहे.
पत्नी आशाबाईचा महिन्यापूर्वी अपघात झाल्याने तिला पाहण्यासाठी सासरवाडीत कन्हाळा खुर्द येथे आलेला होता. त्यानंतर शौचास जाऊन येतो, असे सांगून जो गेला तो घरी आलाच नाही. सकाळी राजेंद्र नीळकंठ चौधरी यांच्या शेतातील विहिरीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याचे शेतमालकाने पाहिले. तसेच विहिरीच्या शेजारी चपल्याही दिसून आल्या. याची माहिती त्याने ग्रामस्थांना दिली.
तपास केल्यानंतर मयत संतोष चंदनशिवे असल्याचे निष्पन्न झाले. आत्माराम देवचंद्र तांबळे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.काँ. अजय माळी करीत आहे.