बोरसेनगरात एकाची आत्महत्या
By Admin | Updated: May 19, 2014 01:52 IST2014-05-19T01:52:31+5:302014-05-19T01:52:31+5:30
धुळे : शहरातील बोरसेनगरातील संजय श्रीराम बोरसे (३८) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली

बोरसेनगरात एकाची आत्महत्या
धुळे : शहरातील बोरसेनगरातील संजय श्रीराम बोरसे (३८) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, संजय यांनी रविवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांना कळताच त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलविले. बोरसे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.