जळगाव : महामार्गावर आहुजा नगराजवळ भरधाव वेगाने येणाºया वाहनाने ४५ वर्षीय तरुणाला चिरडल्याने ही व्यक्ती जागीच ठार झाली. रविवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला असून ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी प्राथमिक स्तरावर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५४ वर्षीय पुरुष रस्त्याने पायी चालत असावा किंवा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. चिरडल्या गेल्याने चेहºयाचा चेंदामेंदा झाला आहे, त्यामुळे ओळख स्पष्ट होऊ शकलेली नाही. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन घेऊन चालक फरार झालेला आहे. अभिजीत अरुण चांदगुडे (३४, रा.वाघ नगर) यांना एक व्यक्ती मृतास्थेत दिसल्याने त्यांनी ही माहिती तालुका पोलिसांना कळविली. त्यांच्याच माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे. पोलिसांचे आवाहनमृत व्यक्ती रंगाने गोरा असून उंची साडे पाच फूट आहे. दोन्ही पाय गुडघ्यापासून वाकलेले, अंगात निळ्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट व करड्या रंगाची फुल पॅँट आहे. संबंधित व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन तपासी अमलदार प्रितम पाटील यांनी केले आहे.
जळगावात महामार्गावर भरधाव वाहनाने एकाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:58 IST
महामार्गावर आहुजा नगराजवळ भरधाव वेगाने येणाºया वाहनाने ४५ वर्षीय तरुणाला चिरडल्याने ही व्यक्ती जागीच ठार झाली. रविवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला असून ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी प्राथमिक स्तरावर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगावात महामार्गावर भरधाव वाहनाने एकाला चिरडले
ठळक मुद्देओळख अस्पष्ट पहाटे चार वाजता झाला अपघात