जळगाव शहरात एक, तर भुसावळ दोन रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:04+5:302021-09-02T04:38:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आता ओसरत असला तरी कोरोनाचा धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. बुधवारी ...

One patient was found in Jalgaon city and two in Bhusawal | जळगाव शहरात एक, तर भुसावळ दोन रुग्ण आढळले

जळगाव शहरात एक, तर भुसावळ दोन रुग्ण आढळले

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आता ओसरत असला तरी कोरोनाचा धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. बुधवारी जळगाव शहरात एक तर भुसावळ दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आली असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूने जिल्ह्यात कहर केला होता़ सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. मात्र अजूनही रूग्ण आढळून येत असून, सद्यस्थितीला २१ कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. तर ३५२ नागरिकांचे कोरोना अलवाल प्रलंबित आहे. बुधवारी जळगाव शहरात एक तर भुसावळ तालुक्यात दोन असे एकूण ३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आली तर या दिवशी तीन बाधित कोरोनावर मात करीत घरी परतले आहे. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७०२ कोरोना बाधित रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४० हजार १०६ बाधितांनी कोरोनावर मात केली असून, २ हजार ५७५ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: One patient was found in Jalgaon city and two in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.