शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जेलमधील दोन आरोपींची बाहेर येत एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:32 IST

डांबून ठेवले : पोलिसासह तीन जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : जिल्हा कारागृहात असलेल्या दोन आरोपींनी बाहेर येत अरूण भिमराव गोसावी (४३, रा. तुकाराम वाडी) याला मारहाण करीत चारचाकी वाहनात डांबून ठेवले आणि एवढेच नाही तर जिल्हा कारागृहाजवळ नेऊन सोडून दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी एका पोलिसासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे (रा. गणेशवाडी), गोलू उर्फ लखन दिलीप मराठे (रा़ शिवाजीनगर) व पोलीस बाबा (पूर्ण नाव माहित नाही) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.अरूण गोसावी हे तुकारामवाडीत कुटूंबासह वास्तव्यास आहेत़ गुरूवारी रात्री ९़४० वाजेच्या सुमारास परिसरातील रिंगा अपार्टमेंटजवळ ते मित्रांसोबत उभे होते़ त्यावेळी चेतन हा गोलू व बाबा पोलीस यांच्यासह या चारचाकी (क्र.एमएच़१९़सीयू़ ८५००) वाहनातून तिथे आला. समोरच्या अपार्टमेंटमध्ये माझे सासू-सासरे राहतात, तुमची इथे उभे राहण्याची हिंमत कशी काय झाली असे धमकावत गोसावी यांना चारचाकी वाहनात डांबून वरील तीन जणांनी बेदम मारहाण केली. तिघांनी गोसावी यांना जबरदस्तीने चारचाकीमध्ये डांबून मारहाण केली़ त्यानंतर चारचाकी जिल्हा कारागृहाच्या दिशेने नेऊन तेथे देखील गोसावी यांना मारहाण केली व मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाजवळ गोसावी यांना सोडून तिघांनी पोबारा केला़ शुक्रवारी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी रात्री घडलेला संपूर्ण प्रकार हा पोलिसांना सांगितला़ त्यानंतर मारहाण करणाऱ्या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन जणांैपकी एक पोलीसदरम्यान, या तीन जणांमधील बाबा हा पोलीस कर्मचारी असल्याचे गोसावी यांनी सांगितले आहे़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपासासाठी पोलीस पथकया प्रकाराची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी तातडीने एक तपास पथक नेमले. पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, मनोज सुरवाडे, विजय पाटील, सचिन पाटील, मुदस्सर काझी यांचा या पथकात समावेश असून या पथकाने शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली.आरोपी बाहेर आला कसाया मारहाणीच्या घटनेतील आरोपी चेतन आळंदे उर्फ चिंग्या, गोलु उर्फ लखन दिलीप मराठे हे खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. ते जेलमध्ये असताना बाहेर येणे हा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही अशा काही घटना येथे घडल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव