पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-याच्या कुटुंबाला एक लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 19:41 IST2018-03-11T19:40:39+5:302018-03-11T19:41:03+5:30

पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-याच्या कुटुंबाला एक लाखाची मदत
आॅनलाइन लोकमत
मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. ११ - पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लक्ष्मण जाधव या शेतक-याच्या कुटुंबाला वन विभागाच्यावतीने एक लाख रुपये मदतीचा धनादेश माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते देण्यात आला.
वढोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत डोलारखेडा शिवारात २ मार्च रोजी ६५ वर्षीय शेतकरी लक्ष्मण जाधव यांच्यावर वाघाने हल्ला केल्याने शेतकºयाचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेत जाधव कुटुंबाने कुटुंब प्रमुख गमावला होता. वन विभागाने तातळीने मरण पावलेल्या शेतकºयाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या साठी शासन स्तरावर मदतीचा प्रस्ताव पाठविला. शासन नियमानुसार ८ लाख रुपये अर्थसाहाय्य या मृत कुटूंबियांना मिळणार आहे. यातील एक लाख रुपयांची मदतीचा धनादेश वनविभागाने दिला आहे. शनिवारी जाधव कुटुंबियांना एकनाथराव खडसे यांच्याहस्ते हा धनादेश देण्यात आला. यावेळी वढोदा वनविभागाचे वनपाल अमोल चव्हाण, भाजपा चे तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, सरचिटणीस संदीप देशमुख, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.