ट्रक-मोटारसायकल अपघातात एक ठार
By Admin | Updated: May 18, 2014 01:28 IST2014-05-18T01:28:32+5:302014-05-18T01:28:32+5:30
मालट्रकने मोटारसायकलला धडक दिली त्यात मोटारसायकलस्वार रामेश्वर भाऊराव चव्हाण (वय २१) रा.पिंपरखेड, ता.चाळीसगाव हा जागीच ठार झाला.

ट्रक-मोटारसायकल अपघातात एक ठार
मेहुणबारे, ता.चाळीसगाव : चाळीसगाव येथून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणार्या मालट्रकने (एच.आर. ५५- क्यू १२६५) समोरून येणार्या मोटारसायकलला (एम.एच. १९ एव्ही ८०१७) धडक दिली त्यात मोटारसायकलस्वार रामेश्वर भाऊराव चव्हाण (वय २१) रा.पिंपरखेड, ता.चाळीसगाव हा जागीच ठार झाला. ही घटना १७ रोजी सायंकाळी ६ वाजता तरवाडे बारीजवळ घडली. रात्री उशिरा मेहुणबारा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)