पारोळा-चोरवड रस्त्यावर एकाचा घातपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:18 IST2021-05-27T04:18:53+5:302021-05-27T04:18:53+5:30

प्रथम जीवनधारा कोविड सेंटरचे डॉक्टर व कर्मचारी यांना ताब्यात घेतले होते. उशिरापर्यन्त त्यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक चाळीसगाव सचिन गोरे, ...

One killed on Parola-Chorwad road | पारोळा-चोरवड रस्त्यावर एकाचा घातपात

पारोळा-चोरवड रस्त्यावर एकाचा घातपात

प्रथम जीवनधारा कोविड सेंटरचे डॉक्टर व कर्मचारी यांना ताब्यात घेतले होते. उशिरापर्यन्त त्यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक चाळीसगाव सचिन गोरे, उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्याकडून चौकशी सुरू होती. यावेळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकास पाचारण करण्यात आले होते, तर सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू ठेवली होती. ट्रकमध्ये जयेश वसंत मालचे (धनोटा, शहादा) हा मृतासोबत असल्याचे समजते.

वाघरे रस्त्यावर दि. २६ रोजी सकाळी ८.३० वाजता सार्वजनिक जागेवर एक ३५ ते ४० वर्षे वयाचा इसम सिध्या कर्मा भिल (कारागड, काटेपाडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) हा रक्तबंबाळ स्थितीत पडल्याची खबर वाघरे पोलीस पाटील भाऊसाहेब आत्माराम हटकर यांनी पारोळा पोलिसात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत पुढील तपास हवालदार सुनील वानखेडे करत आहेत.

Web Title: One killed on Parola-Chorwad road