दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:14+5:302021-09-24T04:19:14+5:30
अमळनेर : धुळ्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलला चारचाकीने मागाहून धडक दिल्याने एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ...

दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर
अमळनेर : धुळ्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलला चारचाकीने मागाहून धडक दिल्याने एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २१ रोजी दुपारी दीडला जानवे डांगरदरम्यान घडली.
किशोर शालीग्राम मिस्तरी (४७) व विकास रमेश पाटील (२८, रा. धार, ता. अमळनेर) हे दोघे मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-बीडब्ल्यू-३८०४) वर धुळ्याकडे जात असताना मागाहून येणारी चार चाकी (क्रमांक एमएच-१९-सीयू-४२४२) वरील चालक रजनीकुमार कांतीभाई पटेल रा. जळगाव यांनी जोरात धडक मारल्याने मोटारसायकल फेकली जाऊन किशोर मिस्तरी यांचा जागीच मृत्यू झाला तर विकास पाटील गंभीर जखमी झाले. चेतन सुतार, शशिकांत बोरसे व अलीम मुजावर यांनी १०८ ने जखमीला डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले. चेतन सुतार यांच्या फिर्यादीवरून रजनीकुमारविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत. मयत किशोर हा सुतारी काम करायचा याच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुली, २ भाऊ असा परिवार आहे.