विचखेडेजवळ अपघातात एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:40+5:302021-08-23T04:20:40+5:30

: पारोळा तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक ६वर विचखेडे गावानजीक अपघात झाल्याने पारोळा शहरातील वर्धमाननगर येथील रहिवासी असलेल्या ५१ वर्षीय ...

One killed, one injured in accident near Wichkhede | विचखेडेजवळ अपघातात एक ठार, एक जखमी

विचखेडेजवळ अपघातात एक ठार, एक जखमी

: पारोळा तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक ६वर विचखेडे गावानजीक अपघात झाल्याने पारोळा शहरातील वर्धमाननगर येथील रहिवासी असलेल्या ५१ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला असल्याची घटना घडली आहे.

नरेश चिंतामण पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनांक २२ रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मित्र रवींद्र दोधुराव पाटील (५१, वर्धमाननगर, ता. पारोळा) मोटारसायकलने (एमएच१९/डीआर४५३७) पारोळ्याहून धुळ्याकडे जात असताना विचखेडे गावाजवळ समोरून येणारा ट्रक (एमएच १८/एम८७९९)वरील चालक रमेश सुखदेव चौधरी (फागणे, जि. धुळे) यांनी आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक भरधाव वेगाने चालवत ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटारसायकल चालकाला जोरदार धडक दिली. त्यात रवींद्र दोधुराव पाटील यांचा मृत्यू झाला व फिर्यादी नरेश चिंतामण पाटील हे जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत ट्रक चालकाविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One killed, one injured in accident near Wichkhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.