जीप व कारच्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 21:10 IST2020-05-26T21:09:07+5:302020-05-26T21:10:13+5:30
मराठखेड्याजवळील घटना : चार जण गंभीर जखमी

जीप व कारच्या अपघातात एक ठार
पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील मराठखेडे गावाजवळ मंगळवारी सकाळी जीप व कारचा अपघात होऊन कारमधील एक जण ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
पारोळा कडून जळगावकडे जाणाऱ्या जीप (एमएच २३/ वाय २४३) वरील चालकाने समोरून येणाºया कारला (एमपी ०९/ सीएन ३७४३) जोरदार धडक दिली. त्यात चालक दिगंबर महाजन जागीच ठार झाला. तर कारमधील पिंकी साधुराम लखानी (वय ३६) , जतीन साधुराम लखानी (१२), निराली साधुराम लखाणी (१०) सर्व रा. सिंधी कॉलनी खंडवा व नीतीन महाजन (३६) हे चार जण गंभीर जखमी झाले. यावेळी संजीव पाटील मराठखेडे, आबा पाटील पातरखेडे, क्रेनचालक राकेश पाटील, प्रदीप चव्हाण,नंदू राजपूत यांनी जखमींना मिळेल त्या वाहनाद्वारे एरंडोल शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर एरंडोल येथे उपचार करून जळगाव येथे हलविले असून जीप चालक हा पसार झालेला आहे.