दोन अपघातात एक ठार, 10 जखमी

By Admin | Updated: December 30, 2015 00:40 IST2015-12-30T00:40:32+5:302015-12-30T00:40:32+5:30

नंदुरबार : दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार, तर 10 जण जखमी झाल्याच्या घटना नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात घडल्या.

One killed and 10 injured in two accidents | दोन अपघातात एक ठार, 10 जखमी

दोन अपघातात एक ठार, 10 जखमी

नंदुरबार : दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार, तर 10 जण जखमी झाल्याच्या घटना नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात घडल्या.

पोलीस सूत्रांनुसार, नऊ-दहा प्रवासी असलेली जीप पिंपळनेर येथून नवापूरकडे जात होती. तेव्हा जीपचालकाचा वाहनावरील ताबा सुटला अन् जीप उलटली व त्याखाली चालक शिवा बुध्या राऊत (वय 45, रा. बसरावड, ता. साक्री, जि. धुळे) दाबला जाऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेत सात प्रवासी किरकोळ स्वरूपात जखमी झाले. नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाटात ही घटना घडली. याप्रकरणी जेठीबाई शिवा राऊत यांनी नवापूर पोलिसात फिर्याद दिली.

दुसरा अपघातही चरणमाळ घाटात घडला. मालवाहू ट्रक (क्रमांक एमएच-18-एम-5479) धुळ्याहून नवापूरकडे जात होता. तेव्हा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व वाहन उलटले. त्यात चालकासह तीन जण जखमी झाले. यात चालक अमृत पृथ्वीराज सरोदे (वय 45), नारायण वामन भिंगाणे व महेश चंद्रालाल बुढाणी (सर्व रा. धुळे) यांचा समावेश आहे.

Web Title: One killed and 10 injured in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.