वाघोदा येथे ट्रॅक्टरचा हुक तुटल्याने एक ठार
By Admin | Updated: April 2, 2017 17:31 IST2017-04-02T17:31:12+5:302017-04-02T17:31:12+5:30
निंभोरा रोडवरील शेतमजूर रवींद्र रामदास काळे (वय 32) हा मजूर ट्रॅक्टरचा हुक तुटल्याने पडल्याने त्याचा मृत्यू झाला़

वाघोदा येथे ट्रॅक्टरचा हुक तुटल्याने एक ठार
वाघोदा बु.।।, ता.रावेर, दि.2 : निंभोरा रोडवरील शेतमजूर रवींद्र रामदास काळे (वय 32) हा मजूर आपल्या सहका:यासोबत चिनावल रस्त्यावरून शेतातील कुट्टी (चारा) वाहत असताना ट्रॅक्टरचा हुक तुटल्याने रवींद्र काळे हा मजूर खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला़ शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़
दरम्यान, काळे हा खाली पडल्यानंतर त्यास तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलवत असताना रस्त्यामध्ये त्याची प्राणज्योत मावळली.
रवींद्र हा जळगाव, कंडारी येथील रहिवासी असून तो आपला मोठा भावासोबत वाघोदा येथे शेतमजुरीनिमित्त वास्तव्यास होता़