फेकरी पुलावर अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 20:24 IST2019-07-11T20:24:02+5:302019-07-11T20:24:36+5:30

महामार्ग वाहतूक ठप्प : घटनेनंतर ट्रक चालक फरार

One killed in an accident at Phakri Bridge | फेकरी पुलावर अपघातात एक ठार

फेकरी पुलावर अपघातात एक ठार

दीपनगर, ता. भुसावळ : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रेल्वे उड्डाण पुलावर बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मनारखेडा येथील तरूण विशाल अनिल शिंदे (वय २६) गाडी सर्विसिंग साठी भुसावळकडे जात असताना त्याला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती अशी की, येथून जवळच असलेल्या मनारखेडा तालुका भुसावळ येथील तरुण विशाल अनिल शिंदे हा आपली दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएम ९९५५ ने भुसावळ येथे वाहन सर्विसिंग करिता येत असताना रेल्वे उड्डाणपुलावर बस या वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाºया ट्रक क्रमांक एम. एच. २९ टी १८९१ ने त्याला समोरून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाचा मृतदेह ५ वाजेपासून सहा वाजेपर्यंत घटनास्थळी पडून होता.
नातेवाईकांनी घेतली धाव
विशालच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविल्यावर ही पोलीस घटनास्थळी लवकर न पोचल्याने मयत झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांकडून पोलीस प्रशासनाविषयी संताप व्यक्त करण्यात येत होता. महामार्गावर भुसावळ वरणगाव कडील वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाल्याने प्रवाशांना देखील मनस्ताप झाला. करावा लागला मात्र घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झाला असून तरुणाचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविछेदनासाठी पाठविण्यात आला आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: One killed in an accident at Phakri Bridge