एक तास पाणीपुरवठा उशिराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:14 IST2021-03-22T04:14:59+5:302021-03-22T04:14:59+5:30

गैरसोय : आजपासून मात्र वेळेनुसार पाणी पुरवठा जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर पंपिंग स्टेशन वरील पाणी पुरवठ्याचा वीजपुरवठा ...

One hour late water supply | एक तास पाणीपुरवठा उशिराने

एक तास पाणीपुरवठा उशिराने

गैरसोय : आजपासून मात्र वेळेनुसार पाणी पुरवठा

जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर पंपिंग स्टेशन वरील पाणी पुरवठ्याचा वीजपुरवठा शनिवारी खंडित झाल्यामुळे, उशिरा टाक्या भरल्या गेल्या होत्या. त्यामुळे रविवारी सकाळी शहरात एक तास उशिराने पाणीपुरवठा करण्यात आल्याचे मनपाचे पाणीपुरवठा अभियंता सुशील साळुंखे यांनी सांगितले. तर सोमवारपासून वेळापत्रकानुसार शहरातील पाणीपुरवठा होणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.

शनिवारी सायंकाळी शहरात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या मध्ये वाघूर पंपिंग स्टेशन जवळील सब स्टेशनचा वीज पुरवठाही खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सात तासांनी हा वीज पुरवठा सुरळीत केला होता. शनिवारी रात्री उशिरा वीज पुरवठा सुरू झाल्याने, परिणामी रात्री उशिरा टाक्या भरल्या गेल्या आणि रविवारी सकाळी शहरात एक तास उशिराने पाणीपुरवठा झाला. दरम्यान, उशिराने पाणीपुरवठा झाला असला तरी शहरात कुठेही कमी दाबाने पाणीपुरवठा झाला नसल्याचे सांगण्यात आले. तर सोमवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.

Web Title: One hour late water supply