एकाने डोक्यात मारला दगड, तर दुसऱ्याने मारली लोखंडी पट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:13 IST2020-12-29T04:13:57+5:302020-12-29T04:13:57+5:30

जळगाव : मावस भावाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारल्याचा राग येऊन दोघांनी संदीप विष्णू सोळंखे (२०, रा. दिनगर नगर) याला ...

One hit him on the head with a stone, while the other hit him with an iron bar | एकाने डोक्यात मारला दगड, तर दुसऱ्याने मारली लोखंडी पट्टी

एकाने डोक्यात मारला दगड, तर दुसऱ्याने मारली लोखंडी पट्टी

जळगाव : मावस भावाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारल्याचा राग येऊन दोघांनी संदीप विष्णू सोळंखे (२०, रा. दिनगर नगर) याला बेदम मारहाण करून डोक्यात लोखंडी पट्टी मारून गंभीर जखमी केल्याची घटना दिनकर नगरात रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अतुल सुधाकर सपकाळे व प्रशांत ऊर्फ भाय (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आसोदा रस्त्यावरील दिनकर नगरात संदीप सोळंखे हा कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. संदीप याचा मावस भाऊ शैलेश समाधान कोळी याला गल्लीतील अतुल सुधाकर सपकाळे आणि प्रशांत ऊर्फ भाय यांनी मारहाण केली होती. हा प्रकार समजल्यानंतर मावस भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी संदीप हा रविवारी (दि. २७) रात्री ८.३० वाजता अतुल आणि प्रशांत यांच्याजवळ आला. भावाला का मारले असे विचारले, याचा राग येऊन दोघांनी संदीपला बेदम मारहाण केली. अतुलने संदीपच्या डोक्यात दगड व लोखंडी पट्टी टाकल्याने तो गंभीर जखमी झाला. संदीपच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात अतुल आणि प्रशांत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सलिम पिंजारी करीत आहेत.

Web Title: One hit him on the head with a stone, while the other hit him with an iron bar