पूरग्रस्तांना टायगर ग्रुपतर्फे ‘एक हात मदतीचा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:21+5:302021-09-15T04:21:21+5:30

जळगाव : चाळीसगाव येथील तितूर व डोंगरी नदीला पूर आल्यामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. अशा पूरग्रस्त कुटुंबांसाठी ...

'One Hand Help' for flood victims by Tiger Group | पूरग्रस्तांना टायगर ग्रुपतर्फे ‘एक हात मदतीचा’

पूरग्रस्तांना टायगर ग्रुपतर्फे ‘एक हात मदतीचा’

जळगाव : चाळीसगाव येथील तितूर व डोंगरी नदीला पूर आल्यामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. अशा पूरग्रस्त कुटुंबांसाठी शहरातील टायगर ग्रुपतर्फे ‘एक हात मदतीचा’ उपक्रम राबविण्यात आला. त्याअंतर्गत संसारोपयोगी वस्तूंचे चारशे किट पूरग्रस्तांना वाटप केले. याप्रसंगी टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव, खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर, सागर कांबळे, सदस्य गौरव उमप, सागर सपके, मनोज बाविस्कर, राहुल उमप, विवेक नेतले, गजानन पाटील, सचिन सोनवणे, सोपान मानकर, आनंद घुगे, अंकुश मराठे, जितू निंबाळकर, अजय शिरसाठ, गणेश गोपाल, रवींद्र पाटील, वैभव शिरसाट, विशाल करोसिया, तसेच जामनेर टायगर ग्रुपचे सदस्य आकाश चौधरी, धीरज पर्वते, दीपक गायकवाड, धनंजय सोनवणे, राजू पठाण, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: 'One Hand Help' for flood victims by Tiger Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.