जनावराचे दीड क्विंटल मांस जप्त

By Admin | Updated: October 11, 2015 00:41 IST2015-10-11T00:41:23+5:302015-10-11T00:41:23+5:30

अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर धाड टाकून पोलिसांनी दीड क्विंटल बैलाचे मांस जप्त केले.

One-half kilos of lean meat seized | जनावराचे दीड क्विंटल मांस जप्त

जनावराचे दीड क्विंटल मांस जप्त

नंदुरबार : शहरातील बिसमिल्ला चौक व रज्जाक पार्क भागात अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर धाड टाकून पोलिसांनी एक लाख पाच हजार रुपये किमतीचे दीड क्विंटल बैलाचे मांस जप्त केले. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून एकास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून या दोन्ही ठिकाणी दोन पथकांमार्फत धाड टाकण्यात आली. दोन्ही ठिकाणी जनावर (बैल) कापून त्याचे मांस तयार करताना तीन जण आढळले. सदर मांस तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिका:यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी बैलाचेच मांस असल्याचा अभिप्राय दिल्यानंतर सुमारे दीड क्विंटल मांस जप्त करून ते नष्ट करण्यात आले. त्याची किंमत एक लाख पाच हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात गोवंश हत्या सुधारणा महाराष्ट्र प्राणी संरक्षण 1976 सुधारणा 1995 चे कलमान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी एकास अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक ए.बी. कटके करीत आहे.

दरम्यान, शहरात रात्रीपासून या कारवाईसंदर्भात विविध अफवा पसरविण्यात आल्या होत्या. त्याबाबत पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

शहरात कुठेही सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी कत्तलखाना सुरू नाही. तसे आढळून आल्यास गोवंश हत्या सुधारणा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण 1976 अधिनियम सुधारणा 1995 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस दल विशेष लक्ष देत असून सामाजिक सलोखा व शांततेस बाधा पोहचविणा:यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

 

Web Title: One-half kilos of lean meat seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.