मोंढाळे येथे एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:21 IST2019-09-17T00:21:01+5:302019-09-17T00:21:21+5:30

पारोळा : तालुक्यातील मोंढाळे प्र.ऊ. गावातील एकाचा नदीच्या काटेरी झुडपातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली. मोंढाळे ...

One dies in water at Mandhale | मोंढाळे येथे एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

मोंढाळे येथे एकाचा पाण्यात बुडून मृत्यू


पारोळा : तालुक्यातील मोंढाळे प्र.ऊ. गावातील एकाचा नदीच्या काटेरी झुडपातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली.
मोंढाळे प्र.ऊ. येथील भटू दला ठाकरे (वय ४५) हे नाणे (ता.जि. धुळे) येथे बहिणीला भेटण्यास गेले होते. १४ सप्टेंबर रोजी ते परत गावात आले पण घरी आले नाही. त्यांचा दोन दिवसांपासून शोध घेतला. मात्र ते आढळून आले नाहीत. त्यांची शोधाशोध सुरू दोन दिवस नातेवाईकांकडून सुरू होती. त्यांचे मृतदेह सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बोरी नदीच्या काटेरी झुडपाच्या पाण्यात मृत अवस्थेत आढळून आले.
याबाबत राहुल भटू ठाकरे यांच्या खबरीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आशिष चौधरी करीत आहेत. दरम्यान परिसरात अशा घटना सातत्याने घडत असून या घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये गूढ कायम आहे.

 

Web Title: One dies in water at Mandhale