कानबाई मिरवणुकीत नाचताना एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:17 IST2019-08-13T21:17:17+5:302019-08-13T21:17:22+5:30

अमळनेर : कोळपिंप्री, ता. पारोळा येथे कानबाई विसर्जन मिरवणुकीत नाचताना प्रमोद पुंडलिक काटे (वय ४२) या तरुणाचा मृत्यू झाला. ...

One dies in Kanbai procession | कानबाई मिरवणुकीत नाचताना एकाचा मृत्यू

कानबाई मिरवणुकीत नाचताना एकाचा मृत्यू



अमळनेर : कोळपिंप्री, ता. पारोळा येथे कानबाई विसर्जन मिरवणुकीत नाचताना प्रमोद पुंडलिक काटे (वय ४२) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १२ रोजी दुपारी घडली.
प्रमोद काटे हे कामानिमित्त सुरत येथे स्थायिक झाले होते. कानबाईच्या कार्यक्रमासाठी ते शनिवारी कोळपिंप्री येथे आले. गावात कानबाईची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. त्या मिरवणुकीत नाचताना त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने अमळनेर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुल असा परिवार आहे.

 

Web Title: One dies in Kanbai procession