दुचाकी स्लिप होउन एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 22:24 IST2019-08-24T22:24:04+5:302019-08-24T22:24:15+5:30
पारोळा : तालुक्यातील बोळे-तामसवाडी रस्त्यावर दुचाकी स्लिप होऊन मागे बसलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा २२ रोजी मृत्यू झाला. याबाबत सुनील ...

दुचाकी स्लिप होउन एकाचा मृत्यू
पारोळा : तालुक्यातील बोळे-तामसवाडी रस्त्यावर दुचाकी स्लिप होऊन मागे बसलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा २२ रोजी मृत्यू झाला.
याबाबत सुनील धुडकू कोळी यांनी फिर्याद दिली. २२ रोजी नरेंद्र गिरासे व श्रावण कोळी हे मोटरसायकल (क्र.एमएच-१९-डीएच-२८७८)ने बोरी धरणाच्या मार्गावर जात असताना वाहन नियंत्रित न झाल्याने स्लिप झाली. मागे बसलेले श्रावण सीताराम कोळी यांना जोरदार मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने नरेंद्र गिरासे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास किशोर पाटील करत आहेत.