वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीत एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST2021-09-17T04:22:38+5:302021-09-17T04:22:38+5:30
वरणगाव, ता. भुसावळ : येथूृन जवळच असलेल्या आयुध निर्माणीमध्ये कार्यरत असलेल्या एका तरुण कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या ...

वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीत एकाची आत्महत्या
वरणगाव, ता. भुसावळ : येथूृन जवळच असलेल्या आयुध निर्माणीमध्ये कार्यरत असलेल्या एका तरुण कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, दि.१६ रोजी सायंकाळी घडली. संदीप प्रकाश सपकाळे (३३) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आयुध निर्माणीमध्ये लिपिकपदी कार्यरत असलेले कर्मचारी संदीप प्रकाश सपकाळे (३३) यांनी राहत्या घरात क्वॉर्टर नंबर १९५, टाईप ‘ए’मध्ये घरी कोणी नसताना घरातील छताच्या हुकाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला नरेंद्र खंडू इंदिश यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार नरसिंग चव्हाण करीत आहेत.