भुसावळात गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 16:02 IST2017-07-19T16:02:58+5:302017-07-19T16:02:58+5:30
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची दीनदयालनगरात कारवाई

भुसावळात गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एकास अटक
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.19 - गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी शहरातील दीनदयाल नगरातील रहिवासी भैय्या उर्फ तुषार दशरथ फालक (वय 33) यास बाजार पेठ पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त केला आहे.
शहरातील दीनदयालनगरातील रहिवासी भैय्या उर्फ तुषार दशरथ फालक याला सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या गुप्त माहितीनुसार वांजोळा रोडवरील बालाजी लॉन समोरुन आरोपी भय्या उर्फ तुषार फालक हा बिना परवाना गावठी पिस्तुल हातात घेऊन फिरताना पोलिसांना आढळून आला.
पो.हे.काँ.निशिकांत जोशी, पो.ना.बंटी सैंदाणे, कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, गुलबक्ष तडवी, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, राहुल चौधरी, वाल्मिक सोनवणे व डीबी पथकातील आनंदसिंग पाटील व कर्मचारी यांनी अटक केली.