दि. १६ जुलै २०२१ रोजी दुपारी चारच्या सुमारास सातपुड्यात सत्रासेन गावात घाटाजवळ जंगलात पुण्यातील काही व्यक्तींनी जुन्या भांडणावरून विकी घोलप व प्रज्ञेश नेटके यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार केला होता. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याला संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांतील एक आरोपी आशुतोष संतोष वराडे ऊर्फ सोन्या वराडे (२१) चिंचवड गाव पुणे याला पिंपरी-चिंचवड येथून घेऊन चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे येथे ११ रोजी रात्री पावणेआठ वाजता अटक केली.
आरोपीस १२ रोजी चोपडा न्यायालयात हजर केले असता त्याला १५ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे तपास करीत आहेत. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पोलीस नाईक शशिकांत पारधी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप निळे, किशोर पवार यांचा समावेश होता.