तीन दिवसात दीड क्विंटल प्लॅस्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST2021-06-27T04:11:50+5:302021-06-27T04:11:50+5:30

अमळनेर : सलग तिसऱ्या दिवशीदेखील पालिकेने दोन प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई करून १० हजार रुपये दंड वसूल केला आहे. ...

One and a half quintals of plastic seized in three days | तीन दिवसात दीड क्विंटल प्लॅस्टिक जप्त

तीन दिवसात दीड क्विंटल प्लॅस्टिक जप्त

अमळनेर : सलग तिसऱ्या दिवशीदेखील पालिकेने दोन प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई करून १० हजार रुपये दंड वसूल केला आहे. तीन दिवसात दीड क्विंटल प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आरोग्य विभागाला प्लॅस्टिकवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, अरविंद कदम, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, जगदीश बिऱ्हाडे, सुरेश चव्हाण, यश लोहरे, फय्याज शेख अहमद, समाधान बच्छाव यांनी बाजारात छापा टाकून गांधलीपुरा भागातील ओम नमो शिवाय: किराणा दुकानदार सुनील आसरमल तोलाणी व हेडगेवार शॉपिंग कॉम्प्लेक्समधील राजेंद्र रामकृष्ण महाजन यांच्या दुकानांवर प्लॅस्टिक विकताना रंगेहाथ पकडले.

त्यांच्याकडून १५ किलो प्लॅस्टिक जप्त करून दोघांकडून प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे १० हजार रुपये दंड वसूल केला आहे. तीन दिवसात पालिका कर्मचाऱ्यांनी दीड क्विंटल प्लॅस्टिक जप्त केले आहे. नंतर ते नष्ट करण्यात येणार आहे.

===Photopath===

260621\26jal_1_26062021_12.jpg

===Caption===

तीन दिवसात दीड क्विंटल प्लास्टिक जप्त

Web Title: One and a half quintals of plastic seized in three days