ट्रॅव्हल्समधून लांबवली दीड लाखाची सोनसाखळी
By Admin | Updated: April 9, 2017 17:57 IST2017-04-09T17:57:09+5:302017-04-09T17:57:09+5:30
उज्वला किरण चौधरी यांची दीड लाख रुपये किमतीची सानेसाखळी ठेवलेली पर्स श्री समर्थ कृपा ट्रॅव्हल्समधून लांबवल्याची घटना रविवारी सकाळी पाच वाजता जळगाव शहरात उघडकीस आली.

ट्रॅव्हल्समधून लांबवली दीड लाखाची सोनसाखळी
जळगाव,दि.9- पुणे येथून जळगावला नातेवाईकाकडे येत असलेल्या उज्जवला किरण चौधरी यांची दीड लाख रुपये किमतीची पाच तोळे सानेसाखळी ठेवलेली पर्स श्री समर्थ कृपा ट्रॅव्हल्समधून लांबवल्याची घटना रविवारी सकाळी पाच वाजता जळगाव शहरात उघडकीस आली. या पर्समध्ये सोनसाखळीसह सहा हजार रुपये रोख व मोबाईल चार्जरही होते.
किरण साहेबराव चौधरी हे प}ी उज्जवला यांच्यासह शनिवारी रात्री निगडी (पुणे) येथून श्री समर्थ कृपा ट्रॅव्हल्समध्ये (क्र.एम.एच.19 वाय.9092) जळगावला येण्यासाठी बसले. शिवकॉलनीतील प्रमोद चौधरी यांच्याकडे हे दाम्पत्य येत होते. पहाटे साडे चार ते पाच या वेळेत ते आकाशवाणी चौकात उतरले असता उज्जवला यांच्याजवळील निळ्या रंगाची पर्स गायब झालेली होती.