पापमोचिनी एकादशीनिमित्त आदीशक्ती संत मुक्ताबाईला १ क्विंटल द्राक्षांची आरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 11:07 IST2023-03-18T11:06:59+5:302023-03-18T11:07:18+5:30

वंजारवाडी जि. नाशिक येथील शांताराम पाटील यांच्यातर्फे ही आरास करण्यात आली.

On the occasion of Papamochini Ekadashi, Decoration of a quintal of grapes to the idol of Sant Muktabai | पापमोचिनी एकादशीनिमित्त आदीशक्ती संत मुक्ताबाईला १ क्विंटल द्राक्षांची आरास

पापमोचिनी एकादशीनिमित्त आदीशक्ती संत मुक्ताबाईला १ क्विंटल द्राक्षांची आरास

विनायक वाडेकर

मुक्ताईनगर, जि. जळगाव : फाल्गुन कृष्ण एकादशी अर्थात पापमोचिनी एकादशीनिमित्त आदीशक्ती श्री संत मुक्ताबाई यांच्या सगुण मूर्तीला एक क्विंटल द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. 

वंजारवाडी जि. नाशिक येथील शांताराम पाटील यांच्यातर्फे ही आरास करण्यात आली. त्यांच्याहस्ते अभिषेक  करण्यात आला. एकादशीनिमित्त बोदवड रस्त्यावरील नवीन मुक्ताबाई मंदिर तसेच जुनी कोथळी येथील मुक्ताबाई मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. नवीन मुक्ताई मंदिर परिसरात निर्माण करण्यात आलेल्या गोपाळ पुऱ्यात देखील भाविकांनी दर्शन घेतले. मुक्ताई संस्थांचे व्यवस्थापक रवींद्र हरणे महाराज,  उध्दव जुनारे महाराज यांनी दोन्ही मुक्ताई मंदिरात चोख व्यवस्था ठेवली होती.

Web Title: On the occasion of Papamochini Ekadashi, Decoration of a quintal of grapes to the idol of Sant Muktabai