शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शौर्य पुरस्कार विजेता पाचव्याच दिवशी उसाच्या फडात, बुडणाऱ्या दोघांना दिले होते जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 08:15 IST

Jalgaon: स्वभावधर्मानुसार त्याने महापुरातून दोघांना बुडताना वाचविले. बालवीर म्हणून केंद्र सरकारकडून दिल्लीत गौरव झाला. ऊसतोड्या करण बालू तडवी याच्या वाट्याला आलेली ही दिवाळी फार दिवस टिकली नाही.

- कुंदन पाटीलजळगाव : स्वभावधर्मानुसार त्याने महापुरातून दोघांना बुडताना वाचविले. बालवीर म्हणून केंद्र सरकारकडून दिल्लीत गौरव झाला. ऊसतोड्या करण बालू तडवी याच्या वाट्याला आलेली ही दिवाळी फार दिवस टिकली नाही. त्याच्या हातात पुन्हा कोयता आला असून आयुष्याचा फड पूर्ववत उसाच्या फडात रंगला आहे. करण तडवी हा चिंचपुरे (पाचोरा, जळगाव) येथील रहिवासी आहे. २०१९ मध्ये पाचोऱ्याच्या बहुळा नदीत वाहून जाणाऱ्या दोघांना करणने काठावर आणले होते. तेव्हा तो १६ वर्षांचाच होता. त्याच्या या धाडसाची केंद्रीय पातळीवर दखल घेतली गेली. 

ऊसतोड झाल्यावर करण शिकणार आहे. गावकरीही मदत करणार आहेत. या हंगामात थोडे पैसे हातात आल्यावर गावी येऊ. मग करणला आम्ही पुन्हा शाळेत पाठवू.- नगीना तडवी, करणची आई

आपल्याला एवढा मोठा पुरस्कार मिळालाय, हे करणच्या गावीही माहीत नव्हते. ही बातमी आली तेव्हा करणसह त्याचे कुटुंबीय ऊसतोडणीसाठी पुणे जिल्ह्यात होते. करणशी संपर्क साधणेही तेव्हा कठीण गेले. सैन्य दलातून निवृत्त झालेले समाधान पाटील या सुभेदाराने करणला शोधून काढत स्वखर्चाने गावी आणले आणि त्याची दिल्लीवारीही घडविली.

गावानेही केला गाैरवnसुभेदार पाटील यांना यातून मोठे ‘समाधान’ वाटले. करणला घेऊन ते गावी आले आणि बक्षिसाची रक्कम जमा करण्यासाठी त्यांनी बँकेत करणचे खाते उघडले. गावानेही करणचा गौरव केला... nपुढे दोन-तीन दिवस करणचे हालहवाल कळले नाहीत. पुरस्काराचे पैसे किती दिवस पुरतील, कमविलेले नावही किती दिवस पुरेल... nम्हणून तो पुन्हा ऊसतोडणीला जुंपलेला आहे. ऊस तोडणे म्हणजेही सेवाच असून आम्ही समाजात साखर पेरतो, असे अभिमानाने सांगतो.

टॅग्स :Jalgaonजळगाव