ओंकार धांडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:10+5:302021-06-04T04:14:10+5:30
दगडू तडवी बिडगाव, ता. चोपडा : निवृत्त शासकीय अभियंता दगडू सायबू तडवी (६१) यांचे अल्पशा आजाराने ...

ओंकार धांडे यांचे निधन
दगडू तडवी
बिडगाव, ता. चोपडा : निवृत्त शासकीय अभियंता दगडू सायबू तडवी (६१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. ते अभियंता सलीम तडवी यांचे वडील होत.
एकनाथ ढाके
खिर्डी, ता रावेर : खिर्डी खुर्द येथील रहिवासी एकनाथ सांडू ढाके (८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. राकेश डिगंबर ढाके यांचे ते आजोबा होत.
भाऊराव पाटील
फरकांडे, ता. एरंडोल : पाटील वाड्यातील भाऊराव लोटू पाटील (८५) यांचे गुरुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, ३ मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते ईश्वर पाटील यांचे वडील होत.