ऑलिम्पिक जागर, अन् तासाभरातच बॅनर कोपऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:16+5:302021-07-18T04:13:16+5:30

टोकियो ऑलिम्पिक काही दिवसांवर आले आहे. त्यात राज्यातूनही काही खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा विचार ...

Olympic vigil, banner in the corner within an hour | ऑलिम्पिक जागर, अन् तासाभरातच बॅनर कोपऱ्यात

ऑलिम्पिक जागर, अन् तासाभरातच बॅनर कोपऱ्यात

टोकियो ऑलिम्पिक काही दिवसांवर आले आहे. त्यात राज्यातूनही काही खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा विचार राज्यकर्त्यांच्या मनात आला. त्यातून बॅनर प्रिंटिंग, सेल्फी पॉईंटच्या जुन्या कल्पनांना नव्याने उकळी फुटली. जिल्हाभरातही हाच कार्यक्रम राबवला गेला. क्रीडा कार्यालयाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते एका बॅनरचे उद्घाटन केले. तेथे आपले फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे आवाहन केले. त्यातील एक बॅनर क्रीडा संकुलाच्या गेटवर लावण्याचे ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयातच राहिला. हळूहळू येणाऱ्या-जाणाऱ्यांनी या बॅनरला कोपऱ्यात सरकवले. आणि आपली नियमित कामे सुरू ठेवली. दोन दिवस बॅनर कोपऱ्यात राहिले. या बॅनरसमोर जिल्हाधिकारी आणि क्रीडा अधिकारी यांच्याशिवाय किती जणांनी सेल्फी काढली. हे बॅनरच जाणो....

आकाश नेवे

Web Title: Olympic vigil, banner in the corner within an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.