चोपडा येथे ऑलिम्पिक जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:46+5:302021-07-24T04:11:46+5:30
हा कार्यक्रम आज २३ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवाजी महाराज चौक येथे झाला. यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून ...

चोपडा येथे ऑलिम्पिक जागरण
हा कार्यक्रम आज २३ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवाजी महाराज चौक येथे झाला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे उपस्थित होते, तसेच चोपडा तालुका क्रीडा समन्वयक आर.पी. आल्हाट, साहेबराव पाटील, क्रीडा महासंघाचे अध्यक्ष अशोक साळुंखे, विवेकानंद विद्यालयाचे शिंपी, मंगेश भोईटे, लोहार, नरेंद्र महाजन, योगेश चौधरी, विलास कोष्टी, ए.पी. बडगुजर, मनोज जाधव, सुधाकर पाटील, अष्टविनायक स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू हजर होते. सौजन्य म्हणून अरविंद जाधव व सुधाकर पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी मंगेश भोईटे यांनी प्रास्ताविक सादर करून ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा समन्वयक आल्हाट यांनी आभार मानले. चोपडावासीयांना व विद्यार्थ्यांना सेल्फी पॉइंटवर फोटो काढून, सर्व ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन केले आहे.
२४/४