शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

'सखे, आपण निराधार देऊया एकमेका आधार', मुडीच्या वृद्ध महिलांनी तरुणांना लाजवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 08:59 IST

म्हातारपणी निराधार जीवन जगत असताना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत धान्यासाठी ऐंशी वर्षाच्या वृद्धेला अडचण आली... कुणाची मदत घेऊ ..या विवंचनेत असताना दुसरी निराधार महिला मदतीला धावून आली.

- संजय पाटीलअमळनेर(जळगाव) : म्हातारपणी निराधार जीवन जगत असताना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत धान्यासाठी ऐंशी वर्षाच्या वृद्धेला अडचण आली... कुणाची मदत घेऊ ..या विवंचनेत असताना दुसरी निराधार महिला मदतीला धावून आली. दोघी निरक्षर तरी जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्यांनी अडचण सोडवली. अशात एक जण त्यांच्या मदतीचा आला आणि त्याला प्रशासनाची जोड मिळाली. दोघाही आजीबाईंची समस्या एका फोनमुळे सुटली. मुडी येथील दमोताबाई बाबुराव पाटील (८५) या वृद्धेच्या पतीचे २० वर्षापूर्वी निधन झाले. मुली लग्न होऊन सासरी गेल्या. भाड्याच्या घरात राहून त्या पिवळ्या रेशन कार्डवर मिळणा-या धान्यावर जीवन जगत आहेत. मात्र मिळणारे धान्य पॉस मशीनवर ‘थम्ब’ लावल्यावरच देण्याचा निर्णय झाला. वय झाल्याने दमोताबाईंच्या बोटांच्या रेषा आधारशी जुळत नाही. यावर रेशन दुकानदाराने अमळनेर येथे जाऊन आधारकार्ड अपडेट करून आणण्याचा सल्ला दिला.

मुडीपासून २२ किमी अमळनेरला जायचे ... नगरपालिका शोधायची कशी ? ..आणि हातच्या रेषा कुठे जुळवायच्या ? असा प्रश्न त्यांना पडला. जगण्याच्या प्रबळ इच्छा त्यांना बळ देऊन गेली. त्यांच्या मदतीला तुळसाबाई नथा चौधरी (७८) या धावल्या. ‘सखे तू आणि मी निराधार एकमेका आधार देत त्या सोबतच अमळनेरला आल्या. नगरपालिका कुठे, आधार कार्ड कुठे अपडेट होणार काहीच माहिती नव्हती. अशा वेळी एका मोटरसायकलस्वाराने त्यांना तहसील कार्यालयात नेले आणि तहसीलदार प्रदीप पाटील यांना घटना सांगितली.प्रदीप पाटील यांनी घटनेचे गांभीर्य समजून घेत तातडीने रेशन दुकानदाराला फोन लावून अशा वृद्ध व्यक्तींना हमीपत्रावर धान्य देता येते, त्यांच्या हाताच्या रेषा आधारकार्डशी जुळत नाहीत अशा व्यक्तींना त्रास देऊ नका... धान्य द्या.... म्हणून सूचना केल्या. वृद्ध महिलेची समस्या मिटली. थकलेल्या शरीरासह , तब्बल २२ किमी प्रवास करून मैत्रिणीला मदत करण्यासाठी दुसºया वृद्धेच्या जिद्दीला सलाम.