रेल्वे अपघातात ठार झालेल्या ती वृद्धा जोशी पेठेतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST2021-03-15T04:15:30+5:302021-03-15T04:15:30+5:30

पिंप्राळा रेल्वे गेटजवळ खांबा क्रमांक (४१८/१४ - १६) जवळ धावत्या रेल्वेखाली वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना ११ मार्च रोजी घडली ...

The old woman who died in the train accident is from Joshi Peth | रेल्वे अपघातात ठार झालेल्या ती वृद्धा जोशी पेठेतील

रेल्वे अपघातात ठार झालेल्या ती वृद्धा जोशी पेठेतील

पिंप्राळा रेल्वे गेटजवळ खांबा क्रमांक (४१८/१४ - १६) जवळ धावत्या रेल्वेखाली वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना ११ मार्च रोजी घडली होती. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सचिन भावसार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वृद्धेचा मृतदेह पंचनामा करून जिल्हा रुग्णालयात हलविला. मयत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केले. मयत महिलेचा भाऊ प्रकाश नामदेव माळी (रा. साखळी, ता.यावल) यांनी रविवारी वृत्तपत्रात आलेल्या वृत्तावरून लोहमार्ग पोलिसात धाव घेतली. तपासी अंमलदार सचिन भावसार यांची भेट घेतल्यावर त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांना जिल्‍हा रुग्णालयात आणले, आईचा मृतदेह बघताच मुलगा मनोज याने एकच हंबरडा फोडत आक्रोश केला.

कमलबाई या ११ मार्चपासून बेपत्ता होत्या. दीड वर्षापूर्वी त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने मानसिक धक्का बसला होता. त्याशिवाय त्यांना फिट‌चाही त्रास असल्याने त्या कोणासही काहीएक न सांगता घरून निघून जात असत. कमलबाई यांच्या पश्चात मुलगा मनोज, सून आरती, नातवंडे भाग्येश, ऋतिका असा परिवार आहे.

Web Title: The old woman who died in the train accident is from Joshi Peth