भरवसला येथे वृद्ध महिलेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:13 IST2021-06-22T04:13:09+5:302021-06-22T04:13:09+5:30
भरवस येथील महिला विमलबाई हनुमंत पाटील (६५) ही १७ रोजी आपल्या शेतात काम करीत होते. त्यावेळी शेजारील अशोक शांताराम ...

भरवसला येथे वृद्ध महिलेला मारहाण
भरवस येथील महिला विमलबाई हनुमंत पाटील (६५) ही १७ रोजी आपल्या शेतात काम करीत होते. त्यावेळी शेजारील अशोक शांताराम पाटील, प्रकाश शांताराम पाटील व योगिता पाटील यांनी सामायिक बांध खोदला असता विमलबाई त्यांना सामायिक बांध खोदू नको, असे बोलली. त्यावेळी तिघांनी तिच्या शेतात प्रवेश करून तिला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतर लोकांनी भांडण आवरल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार करेल, असे सांगितले असता अशोक याने मागून महिलेच्या पाठीत दगड मारल्याने ती जखमी झाली.
तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तिघांनी तिचा मुलगा भैय्यासाहेब यालादेखील दम दिला. उपचारांनंतर तिघांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहेत.