रेल्वेच्या धक्क्याने वृध्दाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST2021-09-18T04:17:26+5:302021-09-18T04:17:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेल्वे रूळ ओंलाडताना रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने तुळशीराम नारायण वाघुळदे (७८, रा.सावखेडा सीम, ता. ...

रेल्वेच्या धक्क्याने वृध्दाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वे रूळ ओंलाडताना रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने तुळशीराम नारायण वाघुळदे (७८, रा.सावखेडा सीम, ता. यावल) या वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सकाळी ९ वाजता जळगाव खुर्द शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तुळशीराम वाघुळदे हे यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी ते जळगाव खुर्द येथील मुलीकडे येण्यासाठी रेल्वेने निघाले. दरम्यान, जळगाव खुर्द शिवारातील रेल्वे रूळ ओलांडत असताना त्यांना रेल्वेचा धक्का लागला. डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच, नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.