शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तापी महामंडळाचे कार्यालय सील : मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोबदला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 04:58 IST

प्रकल्पग्रस्त शेतक-यांना भूसंपादन मोबदल्याची रक्कम न दिल्याने न्यायालयाने तापी पाटबंधारे महामंडळाचे बँक खाते सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून महामंडळाचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

जळगाव - प्रकल्पग्रस्त शेतक-यांना भूसंपादन मोबदल्याची रक्कम न दिल्याने न्यायालयाने तापी पाटबंधारे महामंडळाचे बँक खाते सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून महामंडळाचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. जलसंपदामंत्र्यांच्या जिल्ह्यात असलेल्या या महामंडळावर नामुष्की ओढावली आहे.तापी महामंडळाला प्रकल्पांसाठी पुरेसा निधी सरकारकडून उपलब्ध होत नाही. २०१७-१८ साठी सरकारने या महामंडळाला ३१२ कोटी रूपयांचा निधी दिला होता. तर २०१८-१९ यावर्षासाठी ४२२ कोटींचा निधी दिला आहे. मात्र हा निधी अपुरा असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकºयांना भूसंपदानाचा मोबदला मिळालेला नाही.मुंदखेडा ता.चाळीसगाव येथील प्रकल्पग्रस्तांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.त्यावर न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश या महामंडळाला दिले.मात्र सुमारे ४० कोटींची ही रक्कम देण्यास महामंडळाकडून टाळाटाळ केली जात असल्याने शेतकºयांनी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने महामंडळाचे बँक आॅफ महाराष्टÑमध्ये असलेले एकमेव बँक खाते सील करण्याचे आदेश दिले.आठ दिवसांपासून व्यवहार ठप्पन्यायालयाच्या आदेशानुसार आठ दिवसांपूर्वीच तापी महामंडळाचे बँक खाते सील करण्यात आले आहे. त्यामुळे कुठलीही देणी देणे, पगार, अ‍ॅडव्हान्स आदी सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. या खात्याचे सील लवकर न उघडल्यास कर्मचाºयांचे पगारही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव