Offensive posts on Facebook | फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट

ठळक मुद्देपाचोऱ्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखलआक्षेपार्ह पोस्ट न टाकण्याचे पोलिसांचे आवाहन

पाचोरा, जि.जळगाव : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून जातीय भावना भडकवणाऱ्यांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, फेसबुक या सोशल माध्यमाद्वारे पवन रायगडे व गोपाळ पाटील या दोन्ही फेसबुक अकाऊंटवरून समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान करणारी पोस्ट प्रसिध्द केली होती. या दोन्ही व्यक्तींचा शोध घेतला असता पवन रायगडे हा वेरुळी, ता.पाचोरा येथील, तर गोपाळ पाटील हा गिरड, ता.भडगाव, असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही व्यक्तींविरुध्द पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर कोणीही टाकू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी केले आहे.


 

Web Title: Offensive posts on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.