शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील तांबापुरात झळकले आक्षेपार्ह फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 12:18 IST

शहरातील संवेदनशील भाग म्हणून तांबापुराची ओळख आहे. किरकोळ कारणावरुन या परिसरात दंगली उसळून संचारबंदी लावण्यात आल्याचा इतिहास आहे, असे असतानाही या परिसरात गेल्या काही दिवसापासून आक्षेपार्ह फलक, बॅनर व भींतीवर लिहिलेला मजकूर झळकत आहे. फलक व भींतीवरील मजकूर हा देश व राज्य पातळीवर गाजत असलेल्या विषयाशी संबंधित आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलीस व मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते, असा सूर सध्या शहरात उमटत आहे.

ठळक मुद्देपोलीस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती? तांबापुरात दंगलीचा इतिहास

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : : शहरातील संवेदनशील भाग म्हणून तांबापुराची ओळख आहे. किरकोळ कारणावरुन या परिसरात दंगली उसळून संचारबंदी लावण्यात आल्याचा इतिहास आहे, असे असतानाही या परिसरात गेल्या काही दिवसापासून आक्षेपार्ह फलक, बॅनर व भींतीवर लिहिलेला मजकूर झळकत आहे. फलक व भींतीवरील मजकूर हा देश व राज्य पातळीवर गाजत असलेल्या विषयाशी संबंधित आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलीस व मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते, असा सूर सध्या शहरात उमटत आहे.फलकावर वादग्रस्त मजकूरशिरसोली नाकाकडून इच्छादेवी चौकाकडे जात असताना डाव्या बाजुच्या भींतीवर व श्यामा फायर संकुलाच्या समोर मेहरुणकडे जाणाºया रस्त्यावरील विजेच्या खांबावर हे वादग्रस्त फलक लावण्यात आले आहेत. सध्या राष्टÑीय व आंतरराष्टÑीयस्तरावर चर्चेचा विषय ठरलेल्या विषयाशी निगडीत हे फलक लावण्यात आले असून त्यावर काही छायाचित्रही आहेत. आक्षेपार्ह मजकूरामुळे दोन  गटात मोठा वाद होऊ शकतो असा हा मजकूर आहे. आधीच या विषयावर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत.विना परवानगी लागले फलक?मिळालेल्या माहितीनुसार हे फलक मनपाची परवानगी न घेताच लावण्यात आले आहेत. या परिसरात राष्टÑपुरुषाचा पुतळा देखील आहे. या फलकावर भावना दुखावणारा मजकूर असल्याने या भागात केव्हाही ठिणगी पडू शकते, तसे झाले तर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी वेळ येण्याआधीच मनपा व पोलीस प्रशासनाने हे फलक हटवावे व भींतीवरील वादग्रस्त मजकूर देखील काढावा, असा सूर उमटत आहे. 

सहा वर्षात दोन वेळा दंगल अन् संचारबंदीतांबापुरात दंगलीचा इतिहास आहे. जानेवारी २०१२ मध्ये दोन गटात मोठी दंगली उसळली होती. त्यानंतर २०१४ मध्ये मकरसंक्रातीलाच दंगल उसळली होती. या दंगलीत तत्कालिन पोलीस निरीक्षक बी.के.कंजे, उपनिरीक्षक डी.डी.इंगोले या दोन अधिकाºयांसह काही कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्यावतीने संचारबंदी लावण्यात आली होती. 

पोलीस चौकी असून  उपयोग काय?तांबापुरा हा परिसर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. जिल्ह्यातील संवेदनशील भागाच्या नकाशावर अग्रस्थानी असलेल्या या परिसरात आतापर्यंत अनेकदा दंगली उसळल्या आहेत. तसेच नेहमीच या भागात किरकोळ कारणावरुन मोठे वाद निर्माण होतात. त्यामुळे तांबापुरा व इच्छादेवी चौक या परिससरात स्वतंत्र पोलीस चौकी निर्माण करण्यात आली आहे. त्याशिवाय बीट मार्शल यांचा वावर या भागात सतत असतो. डोळ्यात तेल घालून या परिसरात यंत्रणेचे लक्ष असते. असे असतानाही वादग्रस्त फलक झळकूनही त्याची पोलिसांकडून तसेच मनपाकडून कोणतीही कारवाई होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले  जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा