गुप्तांनी पाठविले आक्षेपार्ह संदेश
By Admin | Updated: November 21, 2015 00:35 IST2015-11-21T00:35:24+5:302015-11-21T00:35:24+5:30
पोलिसांचा दावा : उच्च न्यायालयात जाण्याचा दीपक गुप्तांचा इशारा

गुप्तांनी पाठविले आक्षेपार्ह संदेश
जळगाव/धुळे : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येसंबंधी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, दोषींवर कारवाईची मागणी उचलून धरली म्हणून या प्रकरणातील संशयीतांनी धुळे पोलिसांचा वापर करून आपणास त्रास दिला. या प्रकरणी मानवाधिकार व उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. दरम्यान, गुप्ता यांनी धुळे व नंदुरबार येथील काही प्रतिष्ठीत लोकांना आक्षेपार्ह संदेश पाठविल्याचे धुळे पोलिसांचे म्हणणे आहे. फिर्याद नसतांना उचलले गुप्ता म्हणाले, धुळे, साक्री भागातील काही प्रतिष्ठीतांना माङया मोबाईलवरून अश्लील संदेश गेल्याचा आरोप करीत कुठलीही फिर्याद नसताना, या प्रतिष्ठीतांच्या फक्त तोंडी तक्रारींची दखल धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली. माझा मोबाईल होता व त्यात अकोला येथील व्यक्तीचे सीम टाकून हे संदेश पाठविल्याचे धुळे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांनी तेथे चौकशीदरम्यान सांगितले. दोन दिवसांपूर्वी हे संदेश रात्री 11.30 ते 12.30 वाजेदरम्यान पाठविल्याचेही ते म्हणाले. माङयाविरूद्ध गुन्हा दाखल नसताना धुळे पोलिसांनी मला ताब्यात घेतले. हा प्रकार माङया अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोपही गुप्ता यांनी केला. पहाटेर्पयत पोलिसांच्या ताब्यात जळगाव शहरातून धुळे पोलिसांनी मला गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. धुळे येथे माझी चौकशी केली. पहाटे धुळे पोलीस मला घेऊन जळगावात आले व पहाटे चार वाजेच्या सुमारास घरी सोडले, असेही गुप्ता म्हणाले. लामकानी दरोडय़ाची बतावणी माझी चौकशी लामकानी दरोडय़ासंबंधी करण्यात आली, असे मी बाहेर सांगावे. या अश्लील संदेशप्रकरणी चौकशी केली, असे सांगू नये, अशी सूचना पोलिसांनी मला केल्याचेही गुप्ता म्हणाले. भाजपा नगरसेवकांच्या तक्रारी आपण पालकमंत्री कसा असावा अशी पोस्ट व्हॉट्स अॅपवर टाकल्याने भाजपाच्या कार्यकत्र्यांनी शहरातील पाच पोलिसांत माङयाविरूद्ध तक्रार दिली. सादरे यांची बदली करण्याऐवजी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सादरे यांना निलंबित केले. कदाचीत हे पत्र दिल्याने पोलिसांकडून त्रास देण्याचा प्रकार सुरू झाला असावा, असेही गुप्ता यांनी सांगितले. मोबाईलवरुन आक्षेपार्ह संदेश पाठविल्याचा दावा दीपककुमार गुप्ता यांच्या भ्रमणध्वनीवरून धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना आक्षेपार्ह संदेश पाठविण्यात आले होते. यासंदर्भात त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांना पहाटे 4 वाजेच्या सुमारास सोडण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिल्याचे धुळे प्रतिनिधीने कळविले आहे. आझादनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने दीपककुमार गुप्ता यांना गुरुवारी सायंकाळी जळगावातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा हे पथक गुप्ता यांना घेऊन धुळ्यात दाखल झाले. त्यांच्या भ्रमणध्वनीवरून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींच्या भ्रमणध्वनीवर आक्षेपार्ह संदेश पाठवण्यात आल्याने त्यांची चौकशी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फोन कॉल संदर्भातच दीपककुमार गुप्ता यांची महत्त्वाची चौकशी करायची होती. त्यासाठीच त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. - साहेबराव पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे