Offensive for demanding sugarcane money, crime on all fours | ऊसाचे पैसे मागितल्याने हाणामारी, चौघांवर गुन्हा
ऊसाचे पैसे मागितल्याने हाणामारी, चौघांवर गुन्हा


बोरखेडे बुद्रूक, ता.चाळीसगाव : ऊसाचे पैसे मागितल्यावरून बोरखेडे बु. येथे हाणामारी होऊन चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, अशोक खंडेराव पाटील यांनी ऊसाचे पैसे मागितले असता भांडण होऊ लागले व भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. फिर्यादी अशोक पाटील यांना विश्वनाथ आनंदा पाटील, भिकन शांताराम पाटील, प्रवीण शांताराम पाटील, उमेश नंदू पाटील या चार जणांनी अशोक पाटील यांना मारहाण केली. त्यात अशोक यांचा हात फ्रॅक्चर होऊन ते जखमी झाले आहेत.
याबाबतअशेक पटील यांनी दिलेल्या फियर्दीवरून चार जणांविरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस हवालदार संजयकुमार पाटील हे करीत आहेत.

 

Web Title: Offensive for demanding sugarcane money, crime on all fours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.