विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:21 IST2020-01-25T23:21:51+5:302020-01-25T23:21:56+5:30
पारोळा : येथील बडा मोहल्ला माहेर व भोपाळचे सासर असलेली विवाहिता हिने प्लॉट घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत ...

विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा
पारोळा : येथील बडा मोहल्ला माहेर व भोपाळचे सासर असलेली विवाहिता हिने प्लॉट घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत या साठी सासरच्या मंडळींनी छळ केला. याप्रकरणी सासरच्या नऊ जणांविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील बडा मोहल्ला येथील माहेरवाशीन सज्जीबी शेख इरफान खाटीक हिने प्लॉट घेण्यासाठी २ लाख रुपये आणावेत यासाठी शेख इरफान शरीफ खाटीक, शरीफ सुलेमान खाटीक, खैरावजी शरीफ नसीम गुरफान खाटीक, शाकिर शरीफ खाटीक, आरमाबानो शेख शरीफ खाटीक, नसीमाबी शेख गुरफान खाटीक, तन्नोबी गुरफान खाटीक सर्व रा.एम्स हॉस्पिटलजवळ, सोनमिया बाग, भोपाळ या सासरच्या मंडळींनी २४ फेब्रुवारी २०१७ पासून आजपर्यंत चारित्र्यावर संशय घेत सतत मानसिक शारिरीक त्रास दिला. वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक प्रवीण पाटील हे करीत आहेत.