विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:58 IST2018-12-02T21:55:42+5:302018-12-02T21:58:22+5:30
वाकडी ता.जामनेर येथील विवाहिता मयत कविता ज्ञानेश्वर खडसे (घुगे) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरूद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा
पहूर,ता.जामनेर : वाकडी ता.जामनेर येथील विवाहिता मयत कविता ज्ञानेश्वर खडसे (घुगे) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरूद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या महिन्यात २९ रोजी कविता ज्ञानेश्वर खडसे या विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या विवाहितेला मुळबाळ होत नव्हते. तसेच माहेरून पैसे आणावे यासाठी पतीसह सासरचे वारंवार शारीरिक मानसिक त्रास देत होते. त्रास असह्य झाल्याने कविता हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
विवाहितेचा भाऊ किरण पंडित वाघ (रा.मेहरूण,जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून पती ज्ञानेश्वर गिरधर खडसे (घुगे), संतोष गिरधर खडसे, जिजाबाई संतोष खडसे, आनंदाबाई लक्ष्मण खडसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.