एलबीटी कर भरणे व्यापार्‍यांना बंधनकारक

By Admin | Updated: June 13, 2014 15:08 IST2014-06-13T15:08:23+5:302014-06-13T15:08:23+5:30

शासनाने एलबीटी कराबाबत कोणताही निर्णय घेतला तरी व्यापार्‍यांना २0१३-१४ मधील एलबीटी कराचा भरणा व त्यांचे वार्षिक विवरण ९0 दिवसांच्या आत भरणे बंधनकारक आहे, अशी सूचना आयुक्तांनी दिली आहे.

Obligations to traders to pay LBT tax | एलबीटी कर भरणे व्यापार्‍यांना बंधनकारक

एलबीटी कर भरणे व्यापार्‍यांना बंधनकारक

मनपाच्या सूचना : व्यापार्‍यांना आवाहन

धुळे : शासनाने एलबीटी कराबाबत कोणताही निर्णय घेतला तरी व्यापार्‍यांना २0१३-१४ मधील एलबीटी कराचा भरणा व त्यांचे वार्षिक विवरण ९0 दिवसांच्या आत भरणे बंधनकारक आहे, अशी सूचना आयुक्तांनी व्यापार्‍यांना दिली आहे. 
शासनाने एलबीटी कर बंद करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मनपाला एलबीटी कराची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. तसेच व्यापार्‍यांनाही कराचा भरणा करणे व विवरणपत्र सादर करणे आवश्यकआहे. 
२९ जून अखेर विवरण पत्र न भरल्यास दंडात्मक कारवाईही करण्यात येणारआहे. एलबीटी संदर्भातील सर्व रेकॉर्ड पाच वर्ष सांभाळ.ून ठेवणे आवश्यक असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे.

 

 

Web Title: Obligations to traders to pay LBT tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.