'आयकर'ची उद्दिष्टवारी!

By Admin | Updated: February 13, 2015 15:30 IST2015-02-13T15:30:05+5:302015-02-13T15:30:05+5:30

आयकर विभागाच्या जळगावच्या पथकाने गुरुवारी दीप सिरॅमिक, मुथा सिरॅमिक, भंडारी कस्ट्रक्शन, भूमी डेव्हलपर अँण्ड बिल्डर, आकाश प्लायवूड व अरिहंतम इफ्राप्रोजेक्टच्या कार्यालयाची तपासणी केली.

Objective of income tax! | 'आयकर'ची उद्दिष्टवारी!

'आयकर'ची उद्दिष्टवारी!

जळगाव : आयकर विभागाच्या जळगावच्या पथकाने गुरुवारी दीप सिरॅमिक, मुथा सिरॅमिक, भंडारी कस्ट्रक्शन, भूमी डेव्हलपर अँण्ड बिल्डर, आकाश प्लायवूड व अरिहंतम इफ्राप्रोजेक्ट प्रा.लि.च्या कार्यालयाची गुरुवारी तपासणी केली. सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेली ही तपासणी रात्री आठ वाजेपर्यंत सुरूच होती. 'महसूल'चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही तपासणी असल्याचा दावा व्यावसायिकांनी केला आहे.
राजकमल टॉकीज परिसरातील दीप सिरॅमिकच्या शो-रूममध्ये सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयकर अधिकार्‍यांचे एक पथक सकाळी ११ वाजता दाखल झाले. या पथकाने संचालक विजय लोढा यांच्याकडे दप्तरसह 'आयकर' रकमेचा हिशेब तपासला. तपासणीत अडथळा नको म्हणून व्यवहार बंद ठेवण्याची सूचना केली. 
दुसर्‍या पथकाने विजय लोढा यांच्या औद्योगिक वसाहतीतील गोडावूनमधील स्टॉकची तपासणी केली. या ठिकाणी चार अधिकारी व कर्मचार्‍यांनी आऊट गेट व गोडावूनमधील मालाची तपासणी केली. संध्याकाळपर्यंत ही तपासणी सुरू होती. 
नवीन बी.जे. मार्केट परिसरातील आकाश प्लायवूड या दुकानात तीन अधिकार्‍यांनी कागदपत्रांची तपासणी केली. दुकानमालक रमेश लोचलानी यांच्याकडून या पथकाने स्टॉक रजिस्टर व अन्य कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली. नवीन बसस्थानकाजवळील देशपांडे कॉम्प्लेक्समधील किशोर महाजन यांच्या मालकीच्या भूमी डेव्हलपर अँण्ड बिल्डर या कार्यालयाची तपासणी केली. संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही चौकशी सुरूहोती. महाजन यांच्या मालकीचे हॉटेल गॅलेक्सी आहे. तसेच गणपतीनगरात त्यांच्या बांधकामाची साईट सुरू असल्याची माहिती मिळाली.
रिंगरोड रस्त्यावरील सुमित मुथा व अजय ललवाणी यांच्या मालकीच्या मुथा सिरॅमिक या दुकानात तपासणी केली. 
खान्देश मिल कॉम्प्लेक्समधील वर्धमान भंडारी यांच्या भंडारी कंस्ट्रक्शनची तपासणी केली. भंडारी यांच्या अनेक ठिकाणी साईट सुरू आहेत. रात्री आठ वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती.
राहुल कोटेचा यांच्या मालकीच्या अरिहंतम इंफ्राप्रोजेक्ट प्रा.लि.च्या कार्यालयाची तपासणी केली. तसेच एक मार्बल व स्टाईलच्या दुकानाचीदेखील चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

■ तपासणीसाठी आलेल्या आयकरच्या अधिकार्‍यांनी अचानक धाड टाकली. या अधिकार्‍यांनी चारचाकी किंवा शासकीय वाहनात न येता दुचाकींवर येत संबंधित फर्मची तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
■ ही नियमित तपासणी, असा दावा अजय ललवाणी यांचा असून चौकशीबाबत या क्षणाला काही सांगता येणार नाही, अशी माहिती रमेश लोचलानी यांनी दिली. 

Web Title: Objective of income tax!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.