काँग्रेसच्या विविध समित्या नियुक्तीला पक्षश्रेष्ठींकडे हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST2021-06-18T04:12:58+5:302021-06-18T04:12:58+5:30
एरंडोल : जिल्ह्यातील पिरन अनुष्ठान (पारोळा), ज्ञानेश्वर महाजन (रावेर), अविनाश भालेराव (पाचोरा), विजय महाजन(एरंडोल) हे तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना ...

काँग्रेसच्या विविध समित्या नियुक्तीला पक्षश्रेष्ठींकडे हरकत
एरंडोल : जिल्ह्यातील पिरन अनुष्ठान (पारोळा), ज्ञानेश्वर महाजन (रावेर), अविनाश भालेराव (पाचोरा), विजय महाजन(एरंडोल) हे तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, देवेंद्र मराठे-चाळीसगाव शहराध्यक्ष, अनिल निकम आदी जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबई येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन एरंडोल व पारोळा तालुक्यातील जाहीर झालेल्या विविध समित्यांच्या निवडीला हरकत घेतली आहे. त्या समित्या तहकूब कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी आम्ही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करू, असे आश्वासित केले. जाहीर करण्यात आलेल्या समित्यांमध्ये आघाडीच्या रितीनुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. आपण महाविकास आघाडीत असताना आपल्या पक्षाला सत्तेतील वाट्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस जनांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.